Arthasakshar

Arthasakshar

आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. आपण सगळेच सतत कोणत्या ना कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन असतो. जिथे एक टिचकी मारल्यावर जगभरात उपलब्ध असलेली सगळी माहिती आपल्यासमोर उभी ठाकते, तिथे साधारणपणे ११ कोटी लोकसंख्या असणाऱ्या मराठी भाषिकांसाठी फायदा, गुंतवणूक, नवनविन आर्थिक योजना, आणि जनसामान्यांना पडलेल्या अर्थसंंबंधित प्रश्नांसाठी एकही समर्पित संकेतस्थळ नसावं ही आश्चर्याची बाब आहे. रोजच्या जीवनात अनेक आर्थिक व्यवहार करताना त्याविषयीचे खरे नियम, व सखोल माहिती आपल्याला नसते. ती आंतरजालावर(इंटरनेटवर) शोधायचा प्रयत्न केल्यास फक्त इंग्रजी आणि अत्यंत तांत्रिक संज्ञा वापरून लिहिलेले लेख समोर येतात. या सगळ्यातून आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी ते समजून घेण्याची इच्छाच लोेप पावते. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही अर्थसाक्षर.कॉम हे संकेतस्थळ सुरू केले आहे.अर्थसाक्षरद्वारे गुंतवणूक, कर्ज, अर्थसाक्षरता, विविध प्रकारचे कर-कायदे जसे की आयकर, जी.एस.टी. या प्रमुख व दैनंदिन जीवनातल्य़ा इतर अर्थसंबंधित विषयांवरील खरी, सखोल व पारदर्शक माहिती आपणासमोर प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.ह्या लेखांद्वारे आपली आर्थिक गोष्टी

Podcast website

Listen in your app

Episodes

No episodes yet.